VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 11 October 2021
राष्ट्रवादीच्या वतीने आज बंदच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौकात निदर्शने केली. यावेळी नवाब मलिकही उपस्थित होते. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लखीमपूर हिंसेच्या विरोधात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला मनसेने विरोध केला आहे. मनसेच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या बंदला मनसेने विरोध केला आहे. मग मनसेचा लखीपूरमधील हत्येला पाठिंबा आहे का?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आज बंदच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौकात निदर्शने केली. यावेळी नवाब मलिकही उपस्थित होते. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.