VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 June 2022
पंकजा मुंडे यांना भाजपकडून नेहमीच डावलले जाते. यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच नाराजगी बघायला मिळते आहे. याच मुद्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या दिल्या जात आहेत. पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर चांगलीच टिका केलीये. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे.
पंकजा मुंडे यांना भाजपकडून नेहमीच डावलले जाते. यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच नाराजगी बघायला मिळते आहे. याच मुद्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या दिल्या जात आहेत. पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर चांगलीच टिका केलीये. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधायची देखील आहे. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते, अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी केली आहे.