VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 30 July 2021
उद्धव ठाकरे पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी केली. नृसिंहवाडी हे गाव आठवडाभरापासून पाण्यात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करत आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री कालच कोल्हापूरला जाणार होते. मात्र हवामान विभागाने कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, उद्धव ठाकरे पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी केली. नृसिंहवाडी हे गाव आठवडाभरापासून पाण्यात आहे. पाऊस बंद झाला असला तरी पाणीपातळी अवघी दोन टक्के कमी झाली आहे.