VIDEO : Headline | 2 PM | फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही : संजय राऊत
महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे
महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. पण यामुळे व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 16 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूची दुकान उघडायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरीही जिल्ह्यातील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Published on: Jun 28, 2021 03:24 PM