VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 2 PM | 9 July 2021
नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकार परिषद घेतली.
नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकार परिषद घेतली. पंकजा मुंडे यांनी या चर्चेला पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना पंकजा मुंडे गहिवरल्या (Pankaja Munde Emotional) असल्याचं दिसून आलं.
प्रीतमताई लोकसभेला निवडून आल्या. मला वाटत मुंडे साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा मी एकटीच होते, आमचा एकही आमदार नव्हता, माझ्या पायाला फोड आले होते, मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला, असं सांगत असताना पंकजा मुंडे भावूक झाल्याचं दिसून आलं. प्रीतमताई निवडणुकीला ज्या उभ्या राहिल्या त्या बापाच्या मृत्यूनंतर उभ्या राहिल्या.