VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 May 2022

| Updated on: May 19, 2022 | 3:51 PM

आपल्याच देशात मंदिर-मशिदीचा मुद्दा का उचलून धरतायत, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. वाराणसी येथील ज्ञानवापी मशीदीसारख्या प्रत्येक धार्मिक आणि ऐतिहासिक जागांचं उत्खनन करुन तणाव वाढवायचा, दंगांची स्थिती निर्माण करून निवडणूक जिंकायच्या, हाच भाजपच्या सध्याच्या कारवायांमागे हेतू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर मग आधी चीनच्या ताब्यात असलेलं कैलास मानस सरोवर मिळवून दाखवा. तिथं शंकराचं स्थान आहे. आपल्याच देशात मंदिर-मशिदीचा मुद्दा का उचलून धरतायत, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. वाराणसी येथील ज्ञानवापी मशीदीसारख्या प्रत्येक धार्मिक आणि ऐतिहासिक जागांचं उत्खनन करुन तणाव वाढवायचा, दंगांची स्थिती निर्माण करून निवडणूक जिंकायच्या, हाच भाजपच्या सध्याच्या कारवायांमागे हेतू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी नुकताच लडाख येथे दौरा केला. लडाखमधील सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारने 40 खासदारांची एक समिती नेमली असून यातील सदस्यांमध्ये संजय राऊत यांचा समावेश आहे. नुकताच लडाख दौरा करून नवी दिल्लीत परतलेल्या संजय राऊत यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

Published on: May 19, 2022 03:50 PM
VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 19 May 2022
Vasant More | आम्ही एकत्रचं आहोत, आमच्यात काही मतभेद आहेत मनभेद नाहीत