VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 22 June 2021
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. मात्र, ही बैठक राष्ट्रमंचची आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक होत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. मात्र, ही बैठक राष्ट्रमंचची आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रमंचचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4 वाजता होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रमंचचे नेते यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्यासह 15 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या संसदीय बोर्डाची बैठक होत आहे. या बैठकीला केरळमधील राष्ट्रवादीचे नेते पी. सी. चाको, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.