VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 26 March 2022

| Updated on: Mar 26, 2022 | 3:53 PM

शिवसेना खासदार विनायक राऊत आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपची बेळगावच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचा बंगला पाडणार असल्याचं म्हटलं होतं. किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत.

शिवसेना खासदार विनायक राऊत आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपची बेळगावच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचा बंगला पाडणार असल्याचं म्हटलं होतं. किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांना कोल्हापूरमध्ये विचारलं असता त्यांनी कुणी हातोडा, कुणाला कुदळ, कुणाला फावडा जे घ्यायचं आहे ते घ्या पण हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही तो लढतही राहणार आणि जिंकतही राहणार, असं म्हणत भाजपला आणि किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय विनायक राऊत यांनी भाजपचे आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याबद्दल ही वक्तव्य केलं आहे.

VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 26 March 2022
खेडवरुन Kirit Somaiya दापोलीकडे रवाना