VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 30 july 2022

| Updated on: Jul 30, 2022 | 2:57 PM

राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध सर्वत्र केला जातोयं. उध्दव ठाकरे यांनी तर राज्यपालांवर सडकून टिका देखील केलीयं. उध्दव ठाकरे बोलताना म्हणाले की, ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत.

राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध सर्वत्र केला जातोयं. उध्दव ठाकरे यांनी तर राज्यपालांवर सडकून टिका देखील केलीयं. उध्दव ठाकरे बोलताना म्हणाले की, ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालाविषयी भूमिका घेतली पाहिजे. जे पार्सल कुठून तरी पाठवलं आहे. ते पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल महाराष्ट्रात राहुन जाती पाती आणि धर्मात आगी लावत असेल मराठी माणसाचा अपमान करत असेल तर त्यांना तात्काळ गुन्हा केला असेल र घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं हा निर्णय त्या स्तरावर घेतला जावा ही हिंदूंच्यावतीने मागणी आहे.

Published on: Jul 30, 2022 02:57 PM
घराणेशाहीला डावलत मोदींनी शिंदेना मुख्यमंत्री केलं, म्हणून पवार-काका पुतण्यांच्या पोटात दुखतंय- गोपीचंद पडळकर
राज्यपालांचं स्क्रिप्ट कुठून येत मुंबई कि दिल्ली हे माहित नाही.. – उद्धव ठाकरे