4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 17 July 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. शरद पवारांची मोदींसोबतची चर्चा केवळ प्रशासकीय आहे असं वाटत नाही. पियुष गोयल पवारांना भेटले होते. त्यानंतर राजनाथ सिंह भेटले. त्यानंतर आता मोदी-पवार भेट म्हणजे याला राजकीय अंग आहे. पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?, असं म्हणत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यसंदर्भात मोठं भाष्य केलंय.