4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 29 June 2021

| Updated on: Jun 29, 2021 | 2:02 PM

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad) कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल, तर त्यांचे वेतन स्थगित होऊ शकते. त्या संबंधीचे परिपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे. किमान 20 जुलैपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस (Corona Vaccine) घेण्याची मुदत कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad) कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल, तर त्यांचे वेतन स्थगित होऊ शकते. त्या संबंधीचे परिपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे. किमान 20 जुलैपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस (Corona Vaccine) घेण्याची मुदत कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी, अशी जनजागृती प्रशासन करत आहे. अशात महापालिकेचे कर्मचारी लसीअभावी मागे राहू नयेत, म्हणून थेट वेतन स्थगित करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांनी 20 जुलैपर्यंत लस न घेतल्यास त्यांचं वेतन स्थगित होऊ शकतं, असं परिपत्रकाद्वारे आयुक्तांनी सूचित केलं आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 7 हजार 479 कर्मचारी आहेत. यात अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक कर्मचारी, मानधनावरील तसेच ठेकेदार पद्धतीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, मात्र काही कर्मचाऱ्यांनी अद्यापही ही लस घेतलेली नाही.

Published on: Jun 29, 2021 01:56 PM
Anil Deshmukh | ईडीला आमचं सहकार्य, अनिल देशमुख यांचे वकील LIVE
Anil Deshmukh ED | अनिल देशमुखांनी ईडीकडे 7 दिवसांचा अवधी मागितला