4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 12 November 2021
आम्ही तुमच्या विरोधात नाही. तुमचे प्रश्न सुटावेत हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही कामावर या. राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका, असं आवाहन करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधून पुन्हा एकदा कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यासाठी कोर्टाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीला कोर्टाने 12 आठवड्यांचा वेळ दिला आहे. अभ्यासासाठी दोन चार दिवस लागत नाही. त्यासाठी वेळ लागतो. विलनीकरणाचे दूरगामी परिणाम काय होतील? आर्थिक बोझा किती पडेल? याचा अभ्यास करावा लागणार आहे. सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याचा निर्णय घ्यावा लागतो. हायकोर्टाने विचार करून कालावधी दिला आहे. आम्ही दिला नाही. तोच एक पर्याय आहे. त्या मार्गाचाच अवलंब करावा लागेल. हा विषय उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परब यांनी स्पष्ट केलं.