4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 17 December 2021

| Updated on: Dec 17, 2021 | 3:38 PM

पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर, म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर महाटीईटी (MahaTET) परीक्षेसंदर्भात धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. म्हाडा पेपर फुटी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यात तपास करताना टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघड झाला आहे.

पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर, म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर महाटीईटी (MahaTET) परीक्षेसंदर्भात धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. म्हाडा पेपर फुटी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यात तपास करताना टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कालरात्री गुन्हा दाखल केलाय. तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta ) यांनी दिली आहे. महाटीईटी परीक्षेची जाहिरात 2019 मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर याची परीक्षा जानेवारी 2020 मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

Chhagan Bhujbal | देशातला ओबीसी अडचणीत, ओबीसी आरक्षण थांबवण्यात भाजपचा हात : छगन भुजबळ
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 17 December 2021