4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 18 November 2021

| Updated on: Nov 18, 2021 | 4:03 PM

शरद पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते चार दिवसात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करतील. यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे.

अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये काही समस्या उद्भवली. त्रिपुरात काही घडलं त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणं योग्य नाही. महाराष्ट्रात हिंसेच्या घटना घडवण्यासाठी कायदा हातात घेणं योग्य नाही. महाराष्ट्रातील वातावरण खराब करणं योग्य नाही. त्याचा व्यापारावर मोठा परिणाम होतो. ज्यांची दुकानं फोडली त्यांचा काय दोष? त्रिपुरातील घटनेत व्यापाऱ्यांचा काय दोष? व्यापाऱ्यांचं काम नुकसान होत असेल तर त्याबाबत सरकारनं धोरण आखणं गरजेचं आहे. हिंसक घटनांमध्ये दुकानांचं नुकसान झालं. त्यांच्या मदतीसाठी धोरण आखण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले.

शरद पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते चार दिवसात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करतील. यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. आता त्याच गडात राष्ट्रवादी आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.

Sameer Wankhede यांच्या अडचणीत वाढ होणार? वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी सुरु
Nana Patole | पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा : नाना पटोले