4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 21 September 2021
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील लेटर वॉरचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. राज्यपालांनी साकीनाक्याच्या घटनेवरून दोन दिवसांचं अधिवेशन बोलवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील लेटर वॉरचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. राज्यपालांनी साकीनाक्याच्या घटनेवरून दोन दिवसांचं अधिवेशन बोलवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून केली आहे. त्यावर उत्तराखंडमध्ये नेमकं काय चाललं आहे याची आकडेवारीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तुम्ही देवभूमीचे सुपुत्र आहात. उत्तराखंडमध्ये महिला अत्याचारांवरील घटनेत दीडशे टक्क्याने वाढ झाली आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना आरसाच दाखवला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दीर्घ पत्रं लिहिलं आहे. त्यात महिला अत्याचाराचा मुद्दा कसा देशव्यापी आहे आणि उत्तराखंडची स्थिती काय आहे यावर चर्चा केली आहे. उत्तराखंड ही तर देवभूमीच म्हणावी लागेल. आपण स्वतः या देवभूमीचे सुपूत्र आहात. मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे नेतृत्व आपण केले आहे. उत्तराखंडच्या देवभूमीचा महिलांवरील अत्याचारांचा आलेख देखील चढता आहे. देवभूमीत महिलांवरील अत्याचारांत दीडशे टक्क्यांनी वाढ झाल्याचे सरकारी आकडेच सांगत आहेत. हरिद्वार, डेहराडूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत आहेत. हुंडाबळी, महिलांच्या अपहरणाचे गुन्हेही वाढत आहेत. यावर काय उपाय योजना करावी बरे? तेथेही विधिमंडळाचे खास सत्र बोलवू शकतो काय?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.