4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 22 December 2021
विधानसभा अधिवेशनात आज विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी एका विषयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. तसेच बोलताना पंतप्रधानांसारखा अंगविक्षेपही केला. यावरून भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आक्षेप घेतला.
विधानसभा अधिवेशनात आज विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी एका विषयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. तसेच बोलताना पंतप्रधानांसारखा अंगविक्षेपही केला. यावरून भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आक्षेप घेतला. भास्कर जाधव यांनी एक तर जाहीर माफी मागावी नाही तर त्यांचं तत्काळ निलंबन करावं, या मागणीवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. अन्यथा सभागृह स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून आपले शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतले तरीही भाजपचा संताप आणि कोलाहल सुरुच होता.