4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 23 December 2021
कोरोना संकटातही विधानसभेत बेफिकीर असणाऱ्या सदस्यांना अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. देशात कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधानही कोरोना संकटावर गंभीर आहेत. त्यामुळे देशात रात्रीचा लॉकडाऊन लावण्यावर उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.
सभागृहात मास्क घालून न येणाऱ्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कोरोनाचं संकट अजून गेलं नाही. ओमिक्रॉनचा धोका आहेच पण अजून नवीन विषाणूही आला आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची गंभीर दखल घेतली आहे. आता तर रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा राष्ट्रीय स्तरावर विचार सुरू आहे, अशी माहिती अजित पवार यांनी साभागृहात दिली. त्यामुळे रात्रीचा लॉकडाऊन लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.