पुणेकरांनो वाहनं बाहेर काढताना जपून! 40 सीएनजी पंप चालकांचा दोन दिवसांपासून संप, काय आहे कारण?

| Updated on: Jan 29, 2023 | 10:52 AM

सीएनजी पंप चालकांचा संप असल्याने सीएनजीसाठी वाहन चालकांची मोठी गैरसोय

तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुणेकरांनो जर तुम्ही तुमचे वाहन बाहेर काढत असाल तर जरा जपून! कारण पुण्यातील 40 सीएनजी पंप चालकांचा दोन दिवसांपासून संप सुरू आहे. नफ्याच्या मुद्द्यावरून सीएनजी पंप चालक आक्रमक झाले असून त्यांनी हा संप पुकारला आहे.

पुण्यात सीएनजी पंप चालकांचा संप असल्याने सीएनजी पंप बंद आहेत. त्यामुळे सीएनजीसाठी वाहन चालकांची मोठी गैरसोय होत असून चांगलीच धावपळ देखील होत आहे. जो पर्यंत नफ्याची मागणी मान्य केली जात नाही तो पर्यंत सीएनजी पंप बंद ठेवत संप सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही पंप चालकांनी दिला आहे.

Published on: Jan 29, 2023 10:50 AM
‘वधू मिलन’ नाहीच… सोलापूरच्या बार्शीतील शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक
सत्यजीत तांबे विजयी होणारच, आम्हाला विश्वास!; सरकारमधील मंत्र्याचं विधान