५ वर्षांच्या चिमुकलीला पंकजा मुंडे यांची भुरळ, आई-वडिलांसह तिनं थेट गाठलं परळी अन्…

| Updated on: May 08, 2023 | 10:20 AM

VIDEO | नांदेडच्या ५ वर्षीय चिमुकलीला पंकजा मुंडे यांची पडली भुरळ, थेट आई-वडिलांना घेऊन तिनं पंकजा मुंडे यांचं परळीतील निवासस्थान गाठलं, बघा दोघांमध्ये काय झाल्या चर्चा...

बीड : साधारण सामान्य माणसाला कोणता न् कोणता राजकीय नेता आवडत असतो तर कोणी त्यांचं जबरी फॅन असतं. नांदेड मधील एका चिमुकलीला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भुरळ पडली आहे. या चिमुकलीचं वय अवघं ५ वर्ष…या पाच वर्षीय चिमुकलीला पंकजा मुंडे यांची भुरळ पडल्याने तिने थेट आपल्या आई-वडिलांना घेऊन पंकजा मुंडे यांचं परळीतील निवासस्थान गाठलं. पंकजा मुंडे यांनी देखील सहकुटुंब आलेल्या या चिमुकलीची भेट घेतली. या चिमुकलीचं नाव शर्वरी हमद असं आहे. ती पंकजा मुंडे यांची चाहती आहे. पंकजा मुंडे यांना एकदा जवळून भेटता यावं अशी इच्छा तिची होती आणि असा हट्ट शर्वरीने तिच्या कुटुंबीयांकडे केला होता. अखेर तिने कुटुंबीयांना घेऊन पंकजा मुंडे यांच निवासस्थान गाठलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी शर्वरी बरोबर गप्पा मारून तिच्या सुरेल आवाजातील गाणंही ऐकलंय. शर्वरीचे कौतुक करत पंकजा मुंडे यांनी तिला शाबासकीची थाप दिल्याचेही पाहायला मिळत आहे.

Published on: May 08, 2023 10:15 AM
कर्नाटक निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांची एन्ट्री, शेवटच्या दिवशी निपाणीत काय भूमिका घेणार?
मोदी यांच्यावर टीका करताय, येत्या 10 तारखेला कळेलच; मुख्यमंत्री शिंदे यांचा कोणाला इशारा