नाशिकारांसाठी खुशखबर! आता शहरात धावणार इलेक्ट्रिक बस
VIDEO | नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस, नाशिककरांच्या सेवेत कधी होणार इलेक्ट्रिक बसेस रुजू?
नाशिक : सहा महिन्यांत नाशिक शहरात इलेक्ट्रिक बसेस धावताना दिसणार आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाअभावी रखडलेल्या 50 इलेक्ट्रिक बस येत्या सहा महिन्यांत नाशिककरांच्या सेवेत रुजू होण्याची आशा निर्माण झालीय. केंद्र सरकारच्या ‘एन कॅप’ या योजनेद्वारे मिळणाऱ्या निधीतून 50 इलेक्ट्रिक बसेस चालविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात 25 आणि दुसऱ्या टप्प्यात 25 अशा 50 बसेस बारा वर्षे चालवण्याची जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे. ठेकेदाराला प्रति किलोमीटरच्या स्वरूपात यासाठी अनुदान मिळेल. नाशिक महापालिकेच्या महानगर परिवहन महामंडळाच्या CITY LINK बसच्या ताफ्यात दिवाळीनंतर पहिला टप्प्यात 25 इलेक्ट्रिक बसेस सहभागी होणार आहेत. सहा सहा महिन्यांच्या अंतराने अशा दोन टप्प्यात पन्नास बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. याकरिता केंद्र सरकारकडून 40 कोटी अनुदान देखील देण्यात येणार आहे. त्यातील पहिला टप्प्यातील वीस कोटी अनुदान महापालिकेला देण्यात आले आहे.