पहिल्याच अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा, एसटी प्रवासात 50 टक्के सूट आणि लवकरच…

| Updated on: Mar 09, 2023 | 3:21 PM

VIDEO | अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पात आज महिलांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा, बघा काय म्हणाले...

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात आज महिलांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा करण्यात आली. राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना तब्बल ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत प्रवास करताना महिलांना फक्त निम्मे तिकिट द्यावे लागणार आहे. राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार तसेच महिलांच्या सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यंटन धोरण तयार करणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासह शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांकरिता केंद्र सरकारच्या मदतीने ५० वसतीगृह स्थापन करणार असल्याचे आश्वासनही यावेळी दिले.

Published on: Mar 09, 2023 03:21 PM
शेतकऱ्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका ही आमच्या सरकारची : दीपक केसरकर
Video : नोकरदार महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; नव्या योजनेची घोषणा