50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 20 July 2021

| Updated on: Jul 20, 2021 | 3:26 PM

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्यातही फेरबदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. नव्या फेरबदलात काँग्रेसकडून मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्यातही फेरबदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. नव्या फेरबदलात काँग्रेसकडून मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची एक एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून ही जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षात मंत्रिपद मिळावं म्हणून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, पक्ष श्रेष्ठी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Breaking | मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
Mumbai | अश्लिल व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्राला 23 जुलैपर्यत पोलीस कोठडी