ऐतिहासिक समीकरणं अन् अनोखी लोकसभा, 8 महिन्यात 6 सर्व्हे… मात्र अंदाज अपना-अपना

| Updated on: Mar 06, 2024 | 10:43 AM

लोकसभेच्या कोण किती जागा जिंकणार याचे विविध काळात अनेक सर्व्हे समोर आलेत. महाराष्ट्र स्थापनेनंतर इतिहासात पहिल्यांदा अनोख्या समीकरणांनी लोकसभा निवडणूक होणार आहे. यामध्ये विविध कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, निकाल काय असेल? याबाबतच्या संभ्रमात आणखी भर पडतेय.

मुंबई, ६ मार्च २०२४ : लोकसभेच्या कोण किती जागा जिंकणार याचे विविध काळात अनेक सर्व्हे समोर आलेत. मात्र या सर्व्हेतून आलेल्या आकडयांची तफावत इतकी मोठी आहे की, ज्यामुळे अनेक जण संभ्रमात पडले. विजयाचे दावे दोन्ही बाजूने केले जात आहेत, तरी महाराष्ट्रात लोकसभेचं गणित काय असेल याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. कारण महाराष्ट्र स्थापनेनंतर इतिहासात पहिल्यांदा अनोख्या समीकरणांनी लोकसभा निवडणूक होणार आहे. यामध्ये विविध कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, निकाल काय असेल? याबाबतच्या संभ्रमात आणखी भर पडतेय. यंदा शिवसेनेसह राष्ट्रवादीचे दोन गट पडलेत. अशातच पहिल्यांदाच भाजप शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवार यांची राष्ट्रवादी लढणार आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनासह काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी लढणार आहे. दरम्यान, यासंदर्भात झालेल्या सर्व्हेनुसार, यंदा महायुतीच मविआच वरचढ ठरणार आहे. तर काही सर्व्हेनुसार मविआच महायुतीच्या आव्हानाला रोखणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व सर्व्हे काही दिवसांच्या अंतरावरच झाल्याने विविध सर्व्हेंचा अंदाज अपना-अपना बघायला मिळतंय.

Published on: Mar 06, 2024 10:43 AM