हिंदुत्व की सत्ताकारण? विचारधारेची लढाई आहे की सत्ताकारणाचा खेळ? शिंदे गटाच्या ‘त्या’ 6 हजार पानी उत्तरात काय?
VIDEO | एकनाथ शिंदे गटातील इनसाईड स्टोरी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नोटीसला अखेर एकनाथ शिंदे गटाकडून उत्तर, विधानसभा अध्यक्षांना 6 हजार पानी उत्तर; नार्वेकर काय निर्णय घेणार?
मुंबई, २५ ऑगस्ट २०२३ | शिवसेना हा पक्ष हिंदुत्वापासून दूर गेल्याने आम्ही भाजपसोबत गेलो, असं उत्तर शिंदे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं. शिंदे गटाचं विधानसभा अध्यक्षांना 6 हजार पानी उत्तर दिलंय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार शिवसेना भाजप सोबत आल्याने शिंदे गटाची चांगलीच गोची झाली. अजित पवार गट आपण विकासासाठी भाजपसोबत गेल्याचे सांगतोय. तर शिंदे गट आपण हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेल्याचे सांगतोय. तर भाजप मात्र काँग्रेसच्या नेत्यांना देखील पक्षात घ्यायला तयार आहे. भाजप नेत्यांनीच तशी वक्तव्य केली आहे. त्यामुळेही विचारधारेची लढाई आहे की सत्ताकारणाचा खेळ हा प्रश्न जनतेला पडलाय.
Published on: Aug 25, 2023 11:47 PM