शिवजंयतीनिमित्त तब्बल 61 फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा‎; कुठे उभारला बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 18, 2023 | 11:26 PM

VIDEO | तब्बल ६१ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सध्या ठरतोय चर्चाचा विषय

नाशिक : 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यभरात शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. अशातच नाशिकमध्ये तब्बल ६१ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. ६१ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सध्या एकच चर्चाचा विषय ठरत आहेत. संभाजी महाराज यांनी भेट देत या पुतळ्याची पाहणी देखील केली आहे. या पुतळ्याची उभारणी नाशकातील ६० वर्ष जुन्या अशोकस्तंभ मित्र मंडळाकडून केली जात आहे. या ६१ फूट उंची असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रुंगी २२ फूट तर वजन तब्बल ३ हजार किलो असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Feb 18, 2023 11:26 PM
निवडणूक आयोगाच्या निकालावर अमित शाह म्हणताय; आज उद्धव ठाकरे यांना कळलं असेल की…
संजय राऊत यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानाने ठाकरे गट अडचणीत येणार, काय म्हणाले शंभूराज देसाई?