दिलासादायक! भिवंडीच्या मातोश्री वृद्धाश्रमातील 66 जणांची कोरोनावर मात
भिवंडी तालुक्यातील सोरगावमध्ये असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 79 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने वृद्धाश्रम व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : भिवंडी तालुक्यातील सोरगावमध्ये असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 79 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने वृद्धाश्रम व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे. सोरगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात कोरोनाने शिरकाव केला होता. तब्बल 79 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्व रुग्णांवर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर यातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.