अशीही अनोखी रामभक्ती… 66 वर्षीय माजी सैनिकांनं तब्बल 7 कोटी वेळा लिहिलं श्रीराम नाम!
कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी गावचे 66 वर्षीय मारुती खोत हे भारतीय सैन्यदलात होते. तेव्हापासून त्यांनी श्री राम लिहीत जप करायला आणि श्री राम नामजपाचे पाठ करायला सुरुवात केली. आतापर्यंत जवळपास 7 कोटी 82 लाख 45 हजार 7 इतक्या वेळा लिहिलं श्री राम नाम....
सांगली, १६ जानेवारी २०२४ : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी मधील 66 वर्षीय माजी सैनिक मारुती खोत यांची अनोखी रामभक्ती संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे 22 जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन होत असल्याने कवठेमंकाळ तालुक्यातील विठुरायाची वाडी येथील राम भक्त मारुती खोत अनोखी राम भक्ती पुन्हा सर्वांच्या चर्चेत आले आहेत . कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी गावचे 66 वर्षीय मारुती खोत हे भारतीय सैन्यदलात होते. तेव्हापासून त्यांनी श्री राम लिहीत जप करायला आणि श्री राम नामजपाचे पाठ करायला सुरुवात केली. 8 मे 1981 रोजी खोत यांनी सैन्यात सीमेवर असतानाच मिळेल त्या रजिस्टरमध्ये श्री राम लिहायला सुरुवात केली.
सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर खोत यांनी अधिक जास्त वेळ नाम जप करायला सुरुवात केली. आजही खोत यांचे लिखाण सुरू आहे. आतापर्यंत एकूण 42 वर्षाच्या कालावधी मध्ये छोटी, मोठी अशा तब्बल 235 रजिस्टरमध्ये खोत यांनी श्रीरामाचा जप करत श्री राम श्री राम असे लिखाण केले आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास 7 कोटी 82 लाख 45 हजार 7 इतक्या वेळा आपण श्री राम रजिस्टर वर लिहल्याचा दावा देखील खोत यांनी केला आहे. ही सर्व रजिस्टर आजही खोत यांनी जपून ठेवली आहेत.