मुंबई हायकोर्टात लिफ्ट पडली बंद, ७ जणं अडकले अन्…
VIDEO | मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत आज लिफ्ट बंद पडल्याने उडाली एकच खळबळ, प्रचंड धावपळीनंतर....
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत आज लिफ्ट बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही लिफ्ट बंद पडली. या लिफ्टमध्ये सात जण होते. यामध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या जवानांकडून तिथे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे अडकलेल्या सर्व सातही जणांना बाहेर काढण्यात यश आलं. लिफ्ट उघडल्यानंतर अडकलेल्या सातही जणांनी सुटकेचा श्वास सोडला. सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. अशा ठिकाणी लिफ्टची वेळोवेळी पाहणी केली जात नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Published on: Apr 03, 2023 10:41 PM