चिमुकल्याचा अनोखा रेकॉर्ड, वाढदिवसाच्या दिवशी ५१ किलोमीटर केले सायकलिंग
VIDEO | दुसरीत शिकणाऱ्या चिमुरड्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, ७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली ५१ किलोमीटर सायकलिंग
पुणे : रिआन देवेंद्र चव्हाण या चिमुकल्यानं आपला सातवा वाढदिवस तब्बल 51 किलोमीटर सायकलिंग करून साजरा केला. रियान देवेंद्र चव्हाणच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रियान अवघ्या तीन वर्षाच्या असताना त्याने सिंहगड ट्रेक पूर्ण केला होता. यासह त्याने अनेक किल्ल्यांची चढाई देखील केली आहे. रियानला लहानपणापासूनच ट्रेकिंग, धावणे, सायकलिंगची आवड आहे. रियानचा वाढदिवस 12 फेब्रुवारी रोजी होता यानिमित्ताने त्याने 51 किलोमीटर सायकलिंग करून आपला हा वाढदिवस साजरा केला. रियान हा तीन वर्षाचा होता तेव्हा त्याने सिंहगड ट्रेक पूर्ण केला होता आणि आता त्याने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नुकतीच सायकलिंग करून या नव्या अनोख्या विक्रमाची नोंद करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे.
Published on: Mar 23, 2023 04:50 PM