…और आज हमारे राम आ गये है ! अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचे ‘ते’ खास 84 सेकंद
रामभक्तांची ५०० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२.२९ मिनिटांनी सुरू झालेला ८४ सेकंदाचा मुहूर्त साधत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ठीक १२.०५ मिनिटांनी पंतप्रधान मोदी पारंपारिक वेशभूषेत अयोध्येतील मंदिरात दाखल झालेत.
अयोध्या, २२ जानेवारी २०२४ : रामभक्तांची ५०० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आणि अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आहे. या पूजा विधी साठी ८४ सेकंदाचा खास मुहूर्त साधण्यात आला. असंख्य राम भक्तांच स्वप्न आज पूर्ण झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२.२९ मिनिटांनी सुरू झालेला ८४ सेकंदाचा मुहूर्त साधत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ठीक १२.०५ मिनिटांनी पंतप्रधान मोदी पारंपारिक वेशभूषेत अयोध्येतील मंदिरात दाखल झालेत. लाल रंगाची चोळी आणि चांदीचं छत्र घेऊन मंदिरात प्रवेश केला. प्रत्यक्ष मोदी मंदिरात आल्यानंतर मंदिराची भव्यता कॅमेऱ्याद कैद झाली. मंदिरात दाखल होताच मोदींच्या हस्ते कशी झाली विधीवत पूजा? बघा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jan 22, 2024 11:05 PM