नागपुरच्या ‘सोलार एक्सप्लोझिव्ह’मधील स्फोटात 9 जणांचा मृत्यू, संतप्त कुटुंबीयांचा कंपनीबाहेर ठिय्या अन्…

| Updated on: Dec 17, 2023 | 4:07 PM

नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये आज भीषण स्फोट. रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात झालेल्या या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू, हा स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तर मृतांच्या नातेवाईकांनी संतप्त होत कंपनीबाहेर केलं ठिय्या

नागपूर, १७ डिसेंबर २०२३ : नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये आज भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात झालेल्या या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लँन्टमध्ये पॅकिंगचे काम सुरु असताना अचानक कंपनीत स्फोट झाला. रविवारी सकाळी नऊ वाजता झालेल्या या स्फोटामध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या कंपनीत संरक्षण क्षेत्राशी संबंधित दारूगोळा निर्मितीचे काम सुरु असते. त्यात मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. या केमिकलमुळे हा स्फोट झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तर मृतांच्या नातेवाईकांनी संतप्त होत कंपनीत जाण्याचा मार्गच रोखला असून ठिय्या केला आहे.

Published on: Dec 17, 2023 04:07 PM
बीडच्या १०० एकरात पुन्हा घुमणार जरांगे पाटील यांचा आवाज, इशारा सभेतून कोण असणार टार्गेटवर?
शरद पवार यांच्या ‘त्या’ एका वक्तव्यानं उडाली सर्वत्र खळबळ; म्हणाले, ‘लवकरच नवा इतिहास…’