Ajit Pawar : … आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजित पवार यांचा ‘त्या’ गुप्तभेटीवर मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Dec 01, 2023 | 2:52 PM

धरसोड वृत्तीनं आम्हाला गाफील ठेवले गेले. एक घाव दोन तुकडे करायचे. २ जुलैला आम्ही शपथ घेतली. ३० जूनला कार्यकारणी झाली होती. त्यात सगळे होते. २ जुलैला घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता, तर बोलावले कशाला? अजित पवार यांचा थेट सवाल

Follow us on

कर्जत, १ डिसेंबर २०२३ : कर्जत येथे होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या सोबत झालेल्या भेटीबाबत मोठा खुलासा केला आहे. अजित पवार म्हणाले, आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह काही प्रमुखांना या गोष्टी माहिती होत्या. या भेटीबाबत खुलासा करता ते असेही म्हणाले, राष्ट्रवादीचे बडे नेते देवगिरीला गेलो, पुढे काय करायचे याची चर्चा होती. थेट शरद पवार यांनी कसं सांगायचं म्हणून सुप्रिया सुळे यांना माझ्या घरी बोलवलं. यानंतर राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णयाबद्दल सांगताना मला वेळ द्या मी साहेबांना समजावते असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं. दरम्यान, सुप्रिया सुळेला राष्ट्रीय अध्यक्ष करा याची सर्वांनी तयारी दाखवली होती. धरसोड वृत्तीनं आम्हाला गाफील ठेवले गेले. एक घाव दोन तुकडे करायचे. २ जुलैला आम्ही शपथ घेतली. ३० जूनला कार्यकारणी झाली होती. त्यात सगळे होते. २ जुलैला घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता, तर बोलावले कशाला? असा सवाल त्यांनी केला. आम्हाला पुढे जायचे आहे ते आम्ही म्हणत होतो. सगळं पूर्ववत करायचे असा निरोप यायचे. याचा अर्थ तुम्ही आम्हाला गाफील ठेवता का? असा सवालही अजितदादांनी उपस्थित केला.