शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बोट खडकावर आदळून तीन तुकडे अन्…

| Updated on: Jun 24, 2024 | 5:41 PM

शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींना घेऊन जाणाऱ्या बोटीचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक माहिती मिळतेय. दरम्यान, घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू टीम वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, या घटनेतील अधिक माहिती अद्याप समजू शकली नाही.

Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींना घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात झाला. मीडियाच्या प्रतिनिधींना घेऊन जाणाऱ्या बोटीचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक माहिती मिळतेय. दरम्यान, घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू टीम वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, या घटनेतील अधिक माहिती अद्याप समजू शकली नाही. या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याचेही सांगण्यात येत आहे. वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन होते. या भंडारा दौऱ्यादरम्यान मीडियाच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट एका खडकावर आपटली आणि तिचे तीन तुकडे झाल्याची घटना घडली आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पाने रोजगारात वाढ होणार आहे.