कॅफेत घडतंय तरी काय? 15 कॅफेवर पोलिसांच्या धाडी अन् ‘त्या’ जणांवर कारवाई; कुठं घडला प्रकार?
VIDEO | पोलिसांकडून तब्बल 15 कॅफेवर धाडी तर यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाई
बुलढाणा : बुलढाणा शहरातील विविध कॅफेमध्ये बंद दाराची सुविधा देण्यात येत असल्याने काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून त्या कॅफेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. बुलढाणा शहरातील काही कॅफेमध्ये बंद दाराच्या कॅबिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बंद दाराच्या कॅबिनचा काही महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी गैरफायदा घेत असल्याची तक्रार सकल मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्यानंतर बुलढाणा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये बुलढाण्यातील तब्बल 15 कॅफेवर धाडी टाकण्यात आल्या आहेत तर यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे.
Published on: Mar 03, 2023 09:36 AM