Payal Rohatgi | पुण्यात अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल
प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi ) पुन्हा एकदा वादात अडकली आहे. अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल केला आहे
प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi ) पुन्हा एकदा वादात अडकली आहे. अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीवर आता असा आरोप लावण्यात आला आहे की, सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून तिने देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. अभिनेत्री पायल रोहतगी वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करून तिने असे अनेक वाद ओढवून घेतले आहेत. आता पोलिसांनी असा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याबद्दल पायल रोहतगी तसेच अन्य अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.