‘तोपर्यंत राजधानीत ‘दंगल सुरूच राहणार’, पैलवानांच्या आखाड्यात बाहुबली खासदार अडचणीत?

| Updated on: Apr 30, 2023 | 7:32 AM

VIDEO | पैलवानांच्या दंगलीत कोण चितपट होणार? कुस्तीपटू आंदोलक अद्याप जंतर मंतरवर ठाण मांडून, आता नेमकी काय भूमिका?

मुंबई : अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र जो पर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही तो पर्यंत दिल्लीच्या जतंर मंतर मैदानावरून न हटण्याचा इशाराच कुस्तीपटू आंदोलकांनी दिला आहे. अनेक दिवसांच्या आंदोलनानंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र त्याच दिवशी आंदोलक बसलेल्या ठिकाणची वीज कापली गेली. जोपर्यंत बृजभूषण सिंह हे खासदारकीपदासह इतर पदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा कुस्तीपटू आंदोलकांनी दिलाय. मात्र आंदोलन थांबवण्यासाठीच वीज कापल्याचा आरोप केला जातोय. एकीकडे आंदोलन सुरूये तर तिकडेच कुस्तीपटू सरावही करताय. देशातील इतर कुस्तीपटूंचा या आंदोलकांना पाठिंबाही मिळतोय. तर आम्ही खोटे निघाल्या शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे आंदोलकांचे मत आहे. दरम्यान, मोठे खेळाडू यावर बोलण्यास पुढे का येत नाही असा सवालही सोशल मिडीयाद्वारे उपस्थित केला जातोय. काही भाजप नेत्यांनी असेही म्हटले की, कुस्ती संघाने नियमात बदल केल्यानंतर कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांना टार्गेट केलं. बघा कोणते बदल कुस्ती संघाने केले बृजभूषण सिंह राजीनामा देणार की नाही?

Published on: Apr 30, 2023 07:32 AM
काँग्रेस अध्यक्ष खरगेंची जीभ घसरली, पंतप्रधानांनी शिव्यांचा डाटाच काढला; म्हणाले, गाली का जवाब…
‘कोकणाची वाट लावू नका’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘या’ नेत्यानं थेट सुनावलं