एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्या, गुन्हा दाखल

| Updated on: Nov 14, 2024 | 1:49 PM

हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. फार्म हाऊस शेजारी बिना परवाना मंडप, लाउडस्पीकर आणि वाकोडी गावातील शिवारात पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर काल कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप करणे तसेच सावरखेडा शिवारात विनापरवानगी मंडप उभारणी करून कार्यक्रमाच्या नावाखाली पैसे वाटप केल्याचा संतोष बांगर यांच्यावर आरोप आहे. माजी खासदार अँड शिवाजी माने यांच्या तक्रारी वरुण कळमनूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कळमनुरीतील वाकोडी शिवारात महिलांना एकत्र करून पैसे वाटप केले जात असल्याची तक्रार ठाकरे गटाची आहे. याप्रकरणात दुर्लक्ष केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. दरम्यान, या कारवाईनंतर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया देताना हा राजकीय स्टंट असल्याचे म्हटलं आहे. विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. त्यामुळे ते असे आरोप करत असल्याचे संतोष बांगर यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 14, 2024 01:48 PM
Pankaja Munde : पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, जाहीर सभेतून काय केली घोषणा?
प्रचाराच्या रणधुमाळीत डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडलं, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद