आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता, पाहा काय आहे प्रकरण

| Updated on: Nov 17, 2023 | 11:38 PM

आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. बीएमसीचे अधिकारी एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आल्याची माहिती आहे.

मुंबई : लोअर परळच्या पुलाच्या उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. बीएमसीचे अधिकारी एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाणार आहे. आदित्य ठाकरे यांनी बेकायदेशीरपणे उद्घाटन केले होते. आदित्य ठाकरे यांच्यासोबत इतर काही कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्या अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी दुसऱ्या लेनचं बेकायदेशीरपणे उद्घाटन केल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. डिलाईल रोड जवळपास ५ वर्ष वाहतुकीसाठी बंद होता.

Published on: Nov 17, 2023 11:37 PM
प्रस्थापितांना देऊ उत्तर, OBC शंभरात सत्तर; गोपीचंद पडळकर यांचा एल्गार
नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु, पाहा काय आहेत नवीमुंबईकरांच्या प्रतिक्रिया