भाजप आमदार यांच्या पत्नीसह तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, काय आहे प्रकरण?
VIDEO | भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह आणखी तीन जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धस यांच्या पत्नीवर आदिवासी महिलेला धमकवल्याचा आरोप आहे. यावर सुरेश धस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, हा आरोप खोटा, राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केलाय.
बीड, २२ ऑक्टोबर २०२३ | भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह आणखी तीन जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धस यांच्या पत्नीवर आदिवासी महिलेला धमकवल्याचा आरोप आहे. यावर सुरेश धस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, हा आरोप खोटा, राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केलाय. काही व्हिडिओ एडिट करून दाखविण्यात आले आहे. पोलिसांनी लवकर तपास करून सत्यता बाहेर आणावी, हे उद्योग कोण करतंय हे समोर येईल. व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करावी. मी अनेक वर्ष लोक प्रतिनिधी आहे, मी कसं धमकाविणार? असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. माझ्या पत्नी काय बोलली, हे पोलिसांनी तपास करावा, मी लेखी मागणी केली आहे. यामागे मास्टर माईंड कोण आहे याचा तपास पोलिसांनी करावा. या गुन्ह्यात सत्यता काय आहे, यात कोण कोण सामील आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.