Israel-Hamas War : इस्त्रायल-पॅलेस्टाईन-हमास युद्धात राजकीय भूमिकांचा वाद, शरद पवार यांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल काय?
tv9 Marathi Special Report | इस्त्रायल-पॅलेस्टाईन-हमासच्या युद्धावरून राजकीय भूमिका काय? यावरून मोठा वाद रंगला आहे. भारताने इस्त्रायलची बाजू घेऊन पॅलेस्टाईनच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करायला नको, त्यावरून भाजप नेत्यानं शरद पवार यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय.
मुंबई, २० ऑक्टोबर २०२३ | इस्त्रायल-पॅलेस्टाईन-हमासच्या युद्धावरून राजकीय भूमिका काय? यावरून मोठा वाद रंगला आहे. भारताने इस्त्रायलची बाजू घेऊन पॅलेस्टाईनच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करायला नको, त्यावरून भाजप नेत्यानं पवारांच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय. लाखो किमी लांब असलेल्या इस्त्रायल-पॅलेस्टाईन-हमासमध्ये युद्ध होतोय. मात्र भारतात त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागलेत. कोण-कुणाच्या पाठिशी आहेत? कोण कुणाचं समर्थन करतंय? यावादात भाजपनं शरद पवार यांना टार्गेट केलेय. शरद पवार यांनी इस्त्रायलच्या पाठिंब्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. त्यावर नारायण राणे म्हणाले, मोदी यांनी इस्त्रायलचा बाजू नाही घेतली तर इस्त्रायलवर हमासने केलेल्या युद्धाचा निषेध केलाय, असे म्हणत नारायण राणे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलंय. तर इस्त्रायल-पॅलेस्टाईन जमिनीच्या वादात याआधी आणि आताही भारत सरकारची भूमिका पॅलेस्टाईनच्या बाजूने आहे.