टोलवरून मनसे आणि भाजप आमने-सामने, रस्ते-खड्डे अन् टोलचा मुद्दा पुन्हा येणार ऐरणीवर?

| Updated on: Jul 27, 2023 | 7:33 AM

VIDEO | टोलफोडीवरून मनसे विरूद्ध भाजपमध्ये वाद पेटला, टोलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर...बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : रस्ते-खड्डे आणि टोल नाक्याच्या तोडफोडीवरून मनसे विरूद्ध भाजपमध्ये वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे. टोलफोडीवरून मनसे विरूद्ध भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली. दोन महिन्यांपूर्वीच छगन भुजबळ नाशिकच्या रस्त्याबाबत तक्रार करायचे मात्र आता सत्तेत गेल्यानंतर सभागृहात ते मौन झाल्याचे पाहायला मिळतंय. त्यावरूनच विरोधकांनी भुजबळांना घेरलं. तर दुसरीकडे मनसे आणि भाजप आमने-सामने आलेत. अमित ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी सिन्नरचा टोलनाका मनसेने फोडल्यानंतर भाजपने टीका केली. महामार्गांवरचे अपघात, रस्त्यांवरचे खड्डे, टोल नाका मुक्तीची वायदा यावरून राज ठाकरे यांनी भाजपला सवाल केले. यापूर्वीही निवडणुकीवेळी सरसकट आणि दोन वर्षांपूर्वी शहर प्रवेशावरील टोल नाके बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावरही राज ठाकरे यांनी सवाल केलाय. रस्त्यावरील खड्डे आणि नाशिक-मुंबई मार्गावर होणारी वाहतूक कोंडी हा मुद्दा कालही सभागृहात उपस्थित केला गेला. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jul 27, 2023 07:23 AM
केरळमध्ये मुस्लीम लीगच्या घोषणा; भाजपचा राहुल गांधी यांच्यावर वार; ट्विट करत डिवचले
मंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतरही बच्चू कडू यांचं मोठं विधान; म्हणाले, “त्यादिवशी मी अमेरिकेत…”