भारतमाता पहिले मग मातृत्व, 10 महिन्याच्या चिमुकल्याला घरी सोडून देशसेवेसाठी रूजू; व्हिडीओ व्हायरल
VIDEO | देश प्रेम पहिले, असा संदेश देणाऱ्या कोल्हापूरच्या महिला जवान वर्षा पाटील यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर होतोय तुफान व्हायरल
कोल्हापूर : आता असं कोणतंच क्षेत्र नसेल तिथे महिला नाहीत. काळानुसार परिस्थिती बदलत गेली आणि संरक्षण क्षेत्रातील आवकाशातही महिलांनी उंच भरारी घेतली. दरम्यान महिलांना दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. कारण प्रत्येक महिला ही माता देखील असते. मात्र कर्तव्यास आणि मातृभूमीस पहिले प्राधान्य देत या महिला आपली कामगिरी बजावत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथील वर्षा पाटील या भारतीय सीमासुरक्षा दलात (बीएसएफ) मध्ये जवान आहे. त्या वैद्यकीय सुट्टीवर होत्या. आपल्या दहा महिन्याच्या बाळाला घरी सोडून त्या पुन्हा एकदा कर्तव्याच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जात होत्या. कोल्हापूरहून नियुक्तीच्या ठिकाणी जातानाचा कुटुंबांना निरोप देत होत्या. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. बघा भावनिक क्षणाचा व्हिडीओ…