Pankaja Munde | मराठवाड्यातील लोकांसाठी मी आहे हे विसरु नका – पंकजा मुंडे
मराठावाड्यातील प्रत्येक संघटनेशी माझा संपर्क आहे. या संघटनानी कोरोना काळात मोठं काम केलं आहे. तरुणांना एकजूट करण्याची गरज आहे. जी काही मदत लागेल ती मिळेल. केंद्र सरकारच्या मदतीने अजून काही मदत लागली ती करू, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पुणे : पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा विकास संघाचा भव्य मेळावा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. मराठावाड्यातील प्रत्येक संघटनेशी माझा संपर्क आहे. या संघटनानी कोरोना काळात मोठं काम केलं आहे. रोजगाराचा प्रश्न आज सर्वांना भेडसावत आहे. गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप काम केलंय. तरुणांना एकजूट करण्याची गरज आहे. जी काही मदत लागेल ती मिळेल. केंद्र सरकारच्या मदतीने अजून काही मदत लागली ती करू, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.