महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे जाणार? आज होणार फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे म्हणजे लार्जर बेंचकडे हे प्रकरण जाणार का?
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नबाम रेबिया विरुद्ध विधानसभा उपाध्यक्ष प्रकरणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निकाल दिला होता. या निकालाचा फेरविचार केला पाहिजे का? यावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे नबाम रेबिया प्रकरणाचा पुनर्विचार होणार का? त्यासाठी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे म्हणजे लार्जर बेंचकडे हे प्रकरण जाणार का? या दोन प्रश्नांचा निकालही आज लागणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आज ऐतिहासिक निर्णय देण्याची शक्यता असून त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या घटनापीठाने काल राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. ही सुनावणी आता पूर्ण झाली आहे. मात्र याचा निकाल अद्याप राखून ठेवला गेला आहे.