Vasai Horse Rescue | वसईत उघड्या गटाराच्या चेंबरमध्ये अडकलेल्या घोड्याला काढलं बाहेर
वसईच्या पाचूबंदर परिसरात उघड्या गटाराच्या चेंबरमध्ये घोडा अडकल्याची धक्कादायक घटना घडली होती.
वसईतील पाचूबंदर परिसरात उघड्या गटाराच्या चेंबरमध्ये घोडा अडकल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घोड्याला मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू करण्यात अखेर यश आलं. सिमेंटचा कठडा तोडून घोड्याला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलं. या घटनेमुळे वसई पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.