Bhushi Dam: कुणी घरी न सांगता तर कुणी घरच्यांसोबत भुशी डॅमवर! पावसाची मजा लोणावळ्यातच नाहीका?

| Updated on: Jul 10, 2022 | 12:55 PM

Bhushi Dam: दोन वर्षानंतर पहिल्यांदाच इतकी गर्दी एखाद्या पर्यटनस्थळावर पाहायला मिळतीये.

मुंबई: मुंबईत, पुण्यात खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातच जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु झालाय. नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. नागरिकांचे हाल होत आहेत. पण लोणावळ्यात मात्र वेगळं चित्रं आहे.असणारच शेवटी ते फेमस पर्यटनस्थळ आहे! इथे भुशी डॅमवर (Bhushi Dam) पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळतीये. इतकी गर्दी पाहून संपूर्ण महाराष्ट्रच त्या भुशी धरणावर आलाय का काय असा प्रश्न पडतोय! एकतर पावसाळा त्यात वीकएंड (Week End) म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच! दोन वर्षानंतर पहिल्यांदाच इतकी गर्दी एखाद्या पर्यटनस्थळावर पाहायला मिळतीये.

Published on: Jul 10, 2022 12:55 PM
Eknath Shinde: कार्यकर्त्याचं प्रेम बघा! डोक्यावर कोरली एकनाथ शिंदेंची प्रतिमा
देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही हे उद्या कळेल- संजय राऊत