‘काँग्रेसमधील मोठा गट महायुतीत सहभागी होणार’, कुणी केला खळबळजनक दावा?

| Updated on: Aug 21, 2023 | 11:33 PM

VIDEO | 'विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेस मधील बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट अस्वस्थ, त्यामुळे हा गट लवकरच एक मोठा निर्णय घेणार', कुणी केला मोठा दावा?

बुलढाणा, २१ ऑगस्ट २०२३ | बुलढाणा जिल्ह्याचे शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एक अजब दावा करून राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून दिली आहे. विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेस मधील बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट अस्वस्थ आहे. हा गट लवकरच एक मोठा निर्णय घेणार असून महायुतीमध्ये काँग्रेसचे नेते सहभागी होणार असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय भूकंपाची मालिका संपली नसून आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

Published on: Aug 21, 2023 11:33 PM
झाडांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणला 51 किलोचा केक, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचे असेही वृक्षप्रेम
‘आमचे नेते असूदेत किंवा कुणीही, थोडसं तोलून-मापून’; गावित यांच्या त्या वक्तव्यावर भाजप महिला नेत्याची आगपाखड