वाघाची मावशी बिबट्याला पडली भारी, बघा व्हिडीओ कुठं घडली घटना?
VIDEO | मांजराला पकडण्याच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, कुठं घडली घटना?
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी येथे मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह विहिरीत पडल्याची घटना घडली. मात्र, पाण्यात पडल्यानंतर मांजरीने चक्क बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. टेंभुरवाडी येथील अण्णासाहेब सांगळे यांच्या शेताजवळ पहाटेच्या सुमारास बिबट्या भक्ष्यच्या शोधात असताना समोर दिसलेल्या मांजरीचा पाठलाग करण्यास बिबट्याने सुरुवात केली. पाठलाग करतांना सांगळे यांच्या विहिरीचा अंदाज न आल्याने मांजरीसह बिबट्या विहिरीत पडला. पाण्यात पडल्यानंतर बिबट्याने जीव वाचवण्यासाठी विद्युत मोटार ठेवण्यासाठी विहिरीत लावलेल्या लोखंडी अँगलचा आधार घेतला. मांजराला पकडण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला. बिबट्या विहरीत पडल्यानंतर वाघाची मावशी बिबट्याला कशी पडली भारी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.