Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील ब्रिजला भलं मोठं भगदाड, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…

| Updated on: Jul 11, 2024 | 5:47 PM

गेल्या वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव काही ना काही घटना घडत आहे असाच काहीसा प्रकार समोर आला आहे शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शेरे - बावघर - शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गावर बनविण्यात आलेल्या ब्रिजला मोठं भगदाड पडलं आहे.

Follow us on

समृद्धी महामार्गावरून गावांना जाण्यासाठी बनविलेल्या ब्रीजला मोठं भगदाड पडल्याचे समोर आले आहे. महामार्गावरील निकृष्ट दर्जाचे बांधकामाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या महामार्गावर गावागावांना जाण्यासाठी वेगळे रस्ते आणि ब्रिज बसविण्यात आले आहे. मात्र याच ब्रिजला भगदाड पडल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव काही ना काही घटना घडत आहे. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शेरे – बावघर – शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गावर बनविण्यात आलेल्या ब्रिजला मोठं भगदाड पडलं आहे. समृद्धी महामार्गावरून बनवण्यात आलेल्या ब्रिज वरून गावागावात जाण्यासाठी वाहतूक अद्याप सुरू केली नाही, तोच शेरे गावा जवळील ब्रिजला मोठं भगदाड पडले आहे . यामुळे समृद्धी महामार्गावर केलेली निकृष्ट दर्जाचे कामाचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच महामार्गाची पडझड सुरू झाली आहे तर महामार्ग सुरू झाले तर भविष्यात मोठी दुर्घटना घडल्या शिवाय राहाणार नाही.