लेकरांना घेऊन महिला आत्महत्येसाठी शिवारात गेली पण पोलीसही तातडीनं पोहोचले, औरंगाबादमध्ये नेमके काय घडले?
सासरच्या छाळाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या विवाहितेला तिच्या मुलासह वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. बिडकीन शिवारातील एका विहिरीमध्ये उडी मारण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या विवाहितेला ताब्यात घेतले.
औरंगाबाद : सासरच्या छाळाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या विवाहितेला तिच्या मुलासह वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. बिडकीन शिवारातील एका विहिरीमध्ये उडी मारण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या विवाहितेला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सर्तकतेमुळे दोघांचा जीव वाचला आहे. मोबाईल लोकेशनच्या मदतीने माग काढत पोलीस या विवाहितेजवळ पोहोचले व तिला तिच्या मुलासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.